राज्य शासनाचा मोठा निर्णय ! मुख्यमंत्री सहायता निधी आता पूर्णपणे ऑनलाईन

 


राज्य शासनाचा मोठा निर्णय ! मुख्यमंत्री सहायता निधी आता पूर्णपणे ऑनलाईन

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे आता मुख्यमंत्री सहायता निधी योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू केले जाणार आहे.

 

ऑनलाइन प्रक्रियेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू लाभार्थ्यांना उपचारासाठी आर्थिक मदत ही जलद मिळण्यासाठी मदत होणार आहे.

 

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय यांच्या मदत कक्षाची ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार असून या प्रणालीमध्ये अर्ज मंजुरीची प्रक्रिया ही केवळ आठ तासात पूर्ण होणार आहे आणि याच्यामध्ये आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग नसणाऱ्या दवाखान्यामार्फत ही अर्ज सादर करता येणार आहेत.

 

या नवीन प्रणालीमध्ये रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही दवाखान्याच्या माध्यमातून अर्ज भरून आठ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्यामुळे उपचार प्रक्रियेला आता गती येणार आहे.

 

सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, दि. ७ एप्रिल २०२६ पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेसाठी यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.

 

या प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी रुग्णालयांनी आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. राज्यातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी संबंधितांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून, त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ आणि सुलभ पद्धतीने मदत मिळावी यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेसाठी मिळणार ८७५०० ते 1 लाखापर्यंत अनुदान अर्ज कसा करावा आणि बाकी प्रक्रिया काय करावी लागते ते पूर्ण माहिती आहे यात धन्यवाद

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय या मुळे शेतकऱ्यांना होणार फायदा.