राज्य शासनाचा मोठा निर्णय ! मुख्यमंत्री सहायता निधी आता पूर्णपणे ऑनलाईन
राज्य शासनाचा मोठा निर्णय ! मुख्यमंत्री सहायता निधी आता पूर्णपणे ऑनलाईन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे आता मुख्यमंत्री सहायता निधी योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू केले जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू लाभार्थ्यांना उपचारासाठी आर्थिक मदत ही जलद मिळण्यासाठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय यांच्या मदत कक्षाची ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार असून या प्रणालीमध्ये अर्ज मंजुरीची प्रक्रिया ही केवळ आठ तासात पूर्ण होणार आहे आणि याच्यामध्ये आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग नसणाऱ्या दवाखान्यामार्फत ही अर्ज सादर करता येणार आहेत. या नवीन प्रणालीमध्ये रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही दवाखान्याच्या माध्यमातून अर्ज भरून आठ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्यामुळे उपचार प्रक्रियेला आता गती येणार आहे. सर्वसामा...