शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेसाठी मिळणार ८७५०० ते 1 लाखापर्यंत अनुदान अर्ज कसा करावा आणि बाकी प्रक्रिया काय करावी लागते ते पूर्ण माहिती आहे यात धन्यवाद



 नमस्कार मित्रांनो 

  1. अतिशय महत्टीवाची टीप :- तूम्हाला बाकी सर्व प्रोसेस सर्वजन सांगतील परंतु कांदाचाळ ऑनलाई केली तर सातबारा वर पेरा लावणे आवश्यक आहे कांद्याचा नाही तर ऑनलाईन नंबर लागला आणि पेरा नसेल तर अर्ज बाद केला जाऊ शकतो .
  2. पूर्वसंमती आल्याशिवाय कोणताही साहित्य खरेदी करू नये कारण नंतर अडचण येते 
  3. GST धारक धुकांदाराकडून साहित्य खरेदी करणे म्हणजे सबसिडी मिळेल अन्यथा अडचण येईल धन्यवाद 
  4. आता बाकी माहिती बगून घ्या 

कांदाचाळ अनुदान योजना (Kanda Chal Yojana) 

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत राबवली जाते,

 ज्यामध्ये शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी ५०% पर्यंत (जास्तीत जास्त ₹१५०० प्रति मेट्रिक टन) अनुदान मिळते

 ही योजना MahaDBT पोर्टल वर उपलब्ध असून, वैयक्तिक शेतकरी ५ ते १०० मेट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी अर्ज करू शकतात। 


कांदाचाळ अनुदान योजनेची प्रमुख माहिती:

अनुदान रक्कम: कांदाचाळ बांधकामाच्या खर्चाच्या २५ टक्के किंवा रु. १५००/- प्रति मे. टन (जे कमी असेल ते) अनुदान मिळते.

 काही विशेष प्रकरणांत एकूण खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत मदत मिळू शकते।

क्षमता: ५, १०, १५, २०, २५ व ५० मे. टन क्षमतेच्या कांदा चाळी या योजनेसाठी पात्र आहेत।

पात्रता व कागदपत्रे:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा शेतकरी असावा.
  • सातबारा (7/12) आणि होल्डिंग प्रमाणपत्र (८-अ).
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुकची छायांकित प्रत.
  • जातीचे प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)।

अर्ज प्रक्रिया:

शेतकऱ्यांना MahaDBT शेतकरी पोर्टल वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे।

अर्ज केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून पडताळणी करावी लागते.

महत्वाचे: कांदाचाळ महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी ठरवून दिलेल्या आराखड्यानुसारच बांधावी। 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा